अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज खलाटे तर शहराध्यक्षपदी सौ मंगल बोरावके यांची निवड
या क्षेत्रात ग्रामीण साहित्यकांनी मनापासून काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज खलाटे तर शहराध्यक्षपदी सौ मंगल बोरावके यांची निवड
या क्षेत्रात ग्रामीण साहित्यकांनी मनापासून काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
बारामती वार्तापत्र
बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बारामती तालुकाध्यक्षपदी युवराज खलाटे; शहराध्यक्षपदी मंगल बोरावके यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर उपस्थित होते. या बैठकीत साहित्य मंडळाचे तालुका उपाध्यक्ष सौ. अर्चना प्रकाश सातव, सौ.दीपाली मिलन साळुंखे सरचिटणीस सचिन हनुमंत खलाटे, सदस्य रामराजे मारुती घोरपडे, संजय बाबुराव मोरे, पूजा पंजाबराव मोरे, शहर उपाध्यक्ष सौ.विद्या रमेश जाधव, सौ.विजय यशवंत चांदगुडे, सदस्य सौ.अलका शरद रसाळ, डॉ. हिमगौरी सतीश वडगांवकर, सौ. संगीता सुरेश पांढरे, मेराज मोहंमद सलीन बागवान अशी कार्यकारिणी जाहीर करून सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष घुमटकर यांनी सांगितले की साहित्य,कला या क्षेत्रात भरीव काम करण्याच्या संधी आहेत, आपले क्षेत्र ग्रामीण भागातील कवी,लेखक,नाट्य,साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यकांना घेऊन काम करणारे आहे.आपण ठरविले तर नक्कीच आपले साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊन आपल्या मराठी साहित्याचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. या क्षेत्रात ग्रामीण साहित्यकांनी मनापासून काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे, सरचिटणीस सोनम ठाकूर, जिल्हाध्यक्षा हर्षदा झगडे यांनी अभिनंदन केले.