अखेर आमदार पडळकर यांच्या विरोधात महाराष्ट्रातील पहिला गुन्हा बारामती शहर ठाण्यात दाखल..
बारामती : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या विधानानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात आज (ता. २५) रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका अध्यक्षांनी बारामती शहर पोलिसांना या संदर्भात निवेदन सादर केले आहे. त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन बारामती शहर पोलिसांनी आज आमदार गोपीचंद पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. भारतीय दंड संविधानाच्या कलम ५०५(२) अन्वये पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित नगराध्यक्ष पोर्णीमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक अध्यक्ष अमर धुमाळ, महिला अध्यक्ष वनिता बनकर व अनिता गायकवाड, बाळासाहेब तावरे, मदन देवकाते, नवनाथ बल्लाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप व सुभाष सोमाणी यांनी जोपर्यंत पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण पोलिस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.