अखेर काटेवाडीचा तो तलाठी निलंबित,, तहसीलदारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची केली कारवाई
काटेवाडी मधील प्रकार,व्हिडिओ व्हायरल .....

अखेर काटेवाडीचा तो तलाठी निलंबित,, तहसीलदारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची केली कारवाई
काटेवाडी मधील प्रकार,व्हिडिओ व्हायरल …..
बारामती वार्तापत्र
आज काटेवाडी तालुका बारामती येथील एका तलाठ्याने शेतकऱ्याकडून विहीरीची नोंद करण्यासाठी दहा हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांमध्ये व्हायरल झाला त्यामुळे मोठी खळबळ उडाली
काटेवाडी येथील तलाठी महेश मेटे यांनी विकास धायगुडे या शेतकऱ्याच्या विहिरीची नोंद करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती मात्र तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले तसा व्हिडीओ विकास धायगुडे या शेतकऱ्याने केला आणि हा व्हिडीओ प्रसिद्धी माध्यमांमध्ये व्हायरल झाला
तसेच विकास धायगुडे यांनी प्रांत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही दाखल केली त्यानुसार आज बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी या तलाठ्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन केले.