महाराष्ट्र

अखेर ‘तो’ बिबट्या पकडला.

शेतकरी झाला होता भयभीत,कनेहरी मध्ये बिबट्या पकडला.

अखेर ‘तो’ बिबट्या पकडला.

शेतकरी झाला होता भयभीत,कनेहरी मध्ये बिबट्या पकडला.

बारामती वार्तापत्र तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्या अखेर पकडण्यात यश आले आहे. बारामती तालुक्यात काटेवाडी, कण्हेरी परिसरात तिसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी वन विभागाने परिसरात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात हा तिसरा बिबट्या कैद झाला. कैद झालेला मादी बिबट्या आहे. यापूर्वी नर आणि मादी बिबट्या पकडण्यात आले आहेत.हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यांची संख्या नेमकी किती आहे, याबाबत शेतकऱ्यांनी अजूनही धास्ती घेतली आहे. तर वन विभाग देखील बिबट्यांच्या संख्येबाबत शोध घेत आहे. डिसेंबर २०१९ पासून बिबट्यांचा परिसरात वावर आहे. शेळी, मेंढीसह गायी आणि कुत्र्यांचा बिबट्यांनी फडशा पाडला. त्यामुळे परिसरात शेतकरी शेतात जाण्यास तयार नव्हते. ३० जानेवारीला पाहिला बिबट्या पकडण्यात विभागाला यश आले. त्यानंतर १३ फेब्रूवारीला दुसरा बिबट्या पकडण्यात आला. जवळपास चार महिन्यांनी चौथा बिबट्या सापडला आहे.

बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असल्याची माहिती पुढे आली असल्याने त्यांची नेमकी किती संख्या आहे याबाबत वन विभागाने खुलासा करण्याची गरज आहे. पहिला बिबट्या जेरबंद केलेल्या संतोष जाधव यांच्या शेती भागात  बिबट्याचा वावर होता. त्या ठिकाणापासून १०० फूट लांब लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे दुसरा बिबट्या कैद झाला होता. बिबट्याला पकडण्यासाठी जाधव यांच्याच शेतात लावलेल्या  कॅमेऱ्यात रविवारी (दि ७ ) पहाटे तिसरा बिबट्या कैद झाला हे विशेष. या बिबट्याला देखील मोठ्या पोलिस बंदोबस्तात बारामती येथे हलविण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ ,जानेवारी २०२० पासून बिबट्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी, लिम्टेक, कण्हेरी, ढेकळवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील लाकडी  येथे शेळ्या मेंढ्यांची शिकार केली होती. अजून बिबट्याचे जनावरांवर हल्ले सुरूच होते. मात्र , येथील माळावरील हरणांच्या शिकारी देखील बिबट्या करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली .

तालुक्यातील खंडज, निरावगज गावात बिबट्याने मेंढ्यांची शिकार केल्याचा येथील शेतकऱ्यांचा दावा आहे .या भागात पिंजरा लावण्यासाठी मागणी होत आहे. बिबट्याला  बारामती एमआयडीसीतील वन विभागाच्या कार्यालयाच्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!