अजितदादांची बॅटिंग आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष
कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे बारामतीत आले कि कार्यकर्त्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहाटे पाच वाजता उठून आपला दिनक्रम सुरू करणारे अजित पवार अत्यंत व्यस्त असताना मागील महिन्यात एका कार्यकर्त्याच्या आग्रहावरून टू व्हीलर ची पुजा करण्यासाठी त्या ठिकाणी थांबले आणि हार बांधून पूजा केली.
आजही असाच प्रत्यय बारामतीकरांना आला सतीश खुडे या सामान्य कार्यकर्त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेटच्या सामन्यांचे उद्घाटन करण्याची त्याने दादांना विनंती केली. या कार्यकर्त्यांने कार्यक्रमासाठी मुंबईला जाऊन दादांना निमंत्रण दिले होते. आणि मग दिलेला शब्द पाळणारे अजित दादा न येतील तरच नवल. दादा आले त्यांनी व्यासपीठावर जाऊन सन्मान स्वीकारला व सामन्याचे उद्घाटन करत बॅटिंग ही केली. यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशा घोषणाही दिल्या सामान्य कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळणे हेच तर अजित दादांचे ग्लॅमर आहे.