अजितदादांच्या बारामतीत चाललेय काय?
आशा वर्कर्स यांचेही नगर परिषदेसमोर पगारासाठी आंदोलन
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या वतीने कोरोना निर्मूलन कामांकरिता आशा वर्कर्स यांना सर्व्हे करण्याचे काम दिले होते त्यांनीही मग कशाचीही तमा न बाळगता आपले दैनंदिन योगदान देऊन रेड झोन, ग्रीन झोन अशा वेगवेगळ्या ठिकाणी सर्वे करून आपले काम चोख बजावले मात्र आशा वर्कर्स यांना पगार देताना मात्र नगरपरिषदेने हात आखडता घेतला आहे
नगर परिषदेच्या वतीने कोरोना निर्मूलनासाठी आशा वर्कर्स यांना सर्व्हे करण्यासाठी सांगण्यात आले हा सर्वे करण्यासाठी आशा सेविकांना दररोज 200 रुपये व प्रवास भत्त्यासाठी 100 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते तसे आशा वर्कर्स यांना सांगण्यात आले होते मात्र जुलै महिन्यापासून सर्व सेविकांना एक रुपयाही दिला नसल्याचे समोर आले आहे.
कायद्याची भीती दाखवून सर्वे करण्यास सांगितले
कोरोना महामारी मध्ये सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली असताना आशा वर्कर्स यांना कायद्याची भीती दाखवून वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करण्याची भीती दाखवून त्यांना हे सर्वे चे काम करण्यास सांगण्यात आले होते आशा वर्कर्स यांनीही बारामतीत कोरोणाचा प्रभाव असताना आपले काम सुरू ठेवले मात्र आता पगार देण्याची वेळ आल्यावर कोणीही त्यांना वाली उरला नाही असे चित्र निर्माण झाले आहे.
पैशाचा आणि दिवाळीचा काय संबंध
अशा वर्कर्स या नगरपरिषदेला दिवाळीचा सण आला आहे म्हणून आम्हाला आमचे पैसे द्यावेत अशी मागणी केली असताना दिवाळीचा आणि पैशाचा काय संबंध असे वक्तव्य केल्याने या महिला आज चिडून वैतागाने नगरपरिषदेच्या समोर आंदोलन करत होत्या
घोषणांनी परिसर दणानला
कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही. पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा प्रकारच्या घोषणांनी आज नगरपरिषदेचा परिसर दणाणून गेला होता त्यामुळे रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक या प्रकाराकडे क्षणभर उभा राहून पाहत होते
तुमची दिवाळी झाली आमचं काय
नगरपरिषदेच्या प्रांगणात आशा वर्कर्स यांनी चालवलेल्या आंदोलनात आज आमच्या प्रतिनिधीने आंदोलकांची प्रतिक्रिया घेतल्या असता अत्यंत रडवेल्या स्वरात या महिला सांगत होत्या की आज दिवाळी सुरु झाली आहे सगळ्यांच्या घरांमध्ये आकाश कंदील लागले आहेत एक स्त्री म्हणून कुटुंबामध्ये दिवाळीच्या सणामध्ये आम्ही घरी न राहता आमच्या हक्काच्या पगारासाठी नगरपरिषदेच्या प्रांगण समोर बसून आहोत पैसे नसतील तर दिवाळी तरी कशी करावी आमचीही मुलं बाळ आहेत, लक्ष्मीपूजन आले आहे आमच्या घरी येऊन बघा काय परिस्थिती आहे अशा हताश आणि तितक्याच बेडरपणे या महिला आपली व्यथा मांडत होत्या