अजित दादा संरक्षक भिंत व पुलांकडे लक्ष कधी देणार? नागरिकांचा सवाल.
कै डॉ आप्पासाहेब पवार मार्गे जवळील पुल व संरक्षक भिंत चे काम होणे गरजेचे.
अजित दादा संरक्षक भिंत व पुलांकडे लक्ष कधी देणार? नागरिकांचा सवाल.
कै डॉ आप्पासाहेब पवार मार्गे जवळील पुल व संरक्षक भिंत चे काम होणे गरजेचे.
बारामती :वार्तापत्र
कै डॉ आप्पा साहेब पवार मार्ग येथील कऱ्हा नदी जवळील संरक्षक भिंत व नदीवरील पुलाची दुरुस्ती होणे साठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कै डॉ आप्पासो पवार मार्गे यावरती अनेक किती वर्ष झाला छोटा पूल ची दुरवस्था झाली आहे. बारामती मध्ये गेले सहा ते सात महिने पूर्वी आलेल्या पुरा मध्ये वाहून गेला होता याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यावेळी तिथे भेट देऊन संरक्षण भिंत पडलेले पाहून ती भिंत व पुलाचे काम लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश नगर परिषद प्रशासन ला दिले होते… मात्र बारामतीकरांना हा प्रश्न पडला आहे की बारामती मध्ये अजित पवारांनी सांगीतलेल्या शब्दाला नगरपालिकेने फारसं काही मनावर घेतलेले दिसत नाही तात्पुरता स्वरूपाचा दुरुस्तीचे काम करण्यात आले व गेले पंधरा दिवसात पुराचे थोडेसे पाणी आल्याने तेदेखील वाहून गेला पुलावरून धार्मिक स्थळा कडे जाताना भाविकांना खूप अडचणीचे होते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन ने अजित दादा यांच्या सूचनांचे पालन करीत संरक्षक भिंत व पुलाचे काम त्वरित करावे व भाविक व नागरिक यांची सोय करावी अशी मागणी पुढे येत आहे.