अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद;लोकसभेला ताईला मतदान करून साहेबाला खुश केलं,आता खालची निवडणूक आता मला खुश करा.
प्रचार करुन भावनिक सादे व्हिडिओ - सोशल मीडिया

अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद;लोकसभेला ताईला मतदान करून साहेबाला खुश केलं,आता खालची निवडणूक आता मला खुश करा.
प्रचार करुन भावनिक सादे व्हिडिओ – सोशल मीडिया
बारामती वार्तापत्र
लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामतीचे राजकारण रंगले आहे. सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे.
यावेळी देखील पवार कुटुंबामध्येच लढत होत असून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. अजित पवारांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार प्रचार दौरा आखला असून त्यांनी बारामतीकरांशी संवाद साधला आहे. यावेळी आपल्या भाषणातून अजित पवार यांनी भावनिक साद घातली आहे..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी 27 गावांचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधून बारामतीकरांना साद घातली आहे. गावागावामध्ये भेटीगाठी घेऊन बातचीत केली. बारामती दौऱ्यावर असताना सावळ गावात बोलताना अजित पवार म्हणाले, “लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुष केलं आता मला पण खुष करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल,” अशी साद अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली.
पुढे अजित पवार म्हणाले की, “सावळकरांनो मला माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या मनात काय होतं ते तुम्ही बोलत नव्हता पण तुमच्या तुमच्या मधला अंदाज कळत होता. काही लोक म्हणायचे साहेब वडीलधारे आहेत. सुप्रियाताई पडल्या तर साहेबांना कसं वाटेल त्यामुळे आपण ताईला मतदान करू. त्यानुसार तुम्ही मतदान देखील केलं ते देखील मी स्वीकारलं. लोकसभेला ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केलं. माझाही तुमच्यावर तेवढा अधिकार आहे. लोकसभेला ताई आहे, विधानसभेला दादा आहे. आता विधानसभेला दादाला खुश करा. तालुक्याचा विकास ते त्यांच्या परीने करतील मी माझ्या परीने करेल. माझ्याकडे जास्त आमदार आहेत त्यामुळे पक्ष मला मिळाला मी पक्षाचा अध्यक्ष झालो,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
पुढे अजित पवार यांनी विकासकामांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “बारामतीत हजारो कोटी रुपयांची कामे चालू आहेत. आरोग्य बाबतीत बारामतीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत. हे पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचार होणार आहे. बारामतीत 1 लाख 21 हजार महिलांना लाडकी बहीण योजना लाभ मिळतोय. ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीचे सरकार आणावे लागेल. गरीब वर्गाची चांगली परिस्थिती करण्यासाठी योजना सुरू केलीय. आता यापुढे वीज ही सौरऊर्जा पध्दतीने देणार आहे. सर्व योजना सुरू ठेवायच्या असतील तर घड्याळ बटन दाबा… पवार साहेब यांच्यानंतर काम करणं अवघड होतं. परंतु मी विकास कामात अधिक भर घातलीये,” असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.