अठरा जाणंची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर संशयित झालेला ज्येष्ठ हि निगेटिव्ह आला आहे.
काळजी घेण्याचे प्रशासनाचे आव्हान.
अठरा जाणंची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर संशयित झालेला ज्येष्ठ हि निगेटिव्ह आला आहे.
काळजी घेण्याचे प्रशासनाचे आव्हान.
बारामती:वार्तापत्र
तालुक्यातील डोर्लेवाडी येथील 18 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
डोर्लेवाडी येथील कोरोना संशयितासह बारामती शहरातील 12 व ग्रामीण भागातील 10 संशयितांपैकी 18 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे बारामती तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
काल डोर्लेवाडी येथील एका जेष्ठ संशयित रुग्णाचा पुण्याला नेत असताना मृत्यू झाल्यानंतर डोर्लेवाडीसह बारामती शहरात एकच खळबळ उडाली होती.
कोरोनी संशयित असल्याने या ज्येष्ठांचा मृतदेहही नातेवाईकांच्यताब्यात सोपवला गेला नाही, त्यांच्यावर बारामतीतच अंत्यसंस्कार करण्यात आले, आज त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमधील 10 संशयितांची तपासणी करण्यात आली होती, तर शहरातही काल 12 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 18 जणांचे अहवाल सकाळपर्यंत मिळाले असून ते निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.