स्थानिक

अठरा महिन्यांच्या चिमुरड्याने गिळला चाव्यांचा जुडगा,अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी ‘ब्रॉन्कोस्कोपी

कोरोनाचा धोका पत्करुन चार ते पाच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया

अठरा महिन्यांच्या चिमुरड्याने गिळला चाव्यांचा जुडगा,अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी ‘ब्रॉन्कोस्कोपी

कोरोनाचा धोका पत्करुन चार ते पाच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया

बारामती वार्तापत्र

बारामतीत आला. एका अठरा महिन्यांच्या बालकाने खेळता खेळता दोन चाव्यांचा जुडगा गिळला….आणि पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. बारामतीतील डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने या बालकाला जीवदान मिळाले.

केवळ १८ महिन्याच्या बालकाने अनवधानाने चाव्यांचा जुडगा गिळला. तो श्वासनलिकेच्या वरील बाजूत अडकल्याने हे बालक अत्यवस्थ झाले होते. बारामतीतील श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. डाॅ. राजेंद्र मुथा व डाॅ. सौरभ मुथा यांनी अवघ्या अर्ध्या तासात ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करत या बालकाला जीवदान दिले.

डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले

आरुष अतुल गुणवरे (वय 18 महिने)  असे या बालकाचे नाव आहे. 18 महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा प्रकार भिगवणमध्ये घडला. चाव्यांचा जुडगा गिळल्यानंतर आरुषला प्रथम भिगवण येथील दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बारामतीला नेण्याचा सल्ला दिला. आरुषला बारामतीतील श्रीपाल रुग्णालयात आणण्यात आले. आरुषला रुग्णालयात आणल्यावर त्याच्या तोंडातून रक्त आणि लाळ बाहेर येत होती. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती. डॉक्टर मुथा यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरु केले.  त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलिकेच्या वरील बाजुस अडकल्याचे तपासणीत दिसुन आले.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका बालकाने चाव्यांचा जुडगा गिळला, त्याची तब्येत अत्यवस्थ होऊ लागल्याने पालकांनी त्याला घेऊन बारामतीच्या श्रीपाल हॉस्पिटलकडे धाव घेतली. आरुष या बालकाने चाव्या गिळल्यानंतर भिगवण येथील डॉ. त्रिंबक मोरे व डॉ. गाढवे यांनी त्याला तपासल्यानंतर तातडीने बारामतीला नेण्याचा सल्ला दिला.

पालकांनी त्याला सोबत घेत डॉ. राजेंद्र व डॉ.सौरभ मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटलकडे धाव घेतली. रुग्णालयात आणेपर्यंत त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती. तपासणी केल्यावर चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वसननलिकेच्या वरील बाजूस अडकून बसला होता.

धोका पत्करून नाणे काढले

कोरोना संसर्गामुळे लॉकडडाऊन प्रोटोकॉलनुसार शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची कोव्हीड चाचणी घेण्यात आली होती, मात्र चिमुकला बारा तासांपेक्षा अधिक काळ उपाशीपोटी असल्याने अहवाल येण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करणे भाग होते. अखेर कोरोनाचा धोका पत्करुन चार ते पाच डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि आठ वर्षांच्या मुलाने गिळलेले एक रुपयाचे नाणे अन्ननलिकेतून बाहेर काढले.

डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांनी परीस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरु केले. त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलीकेच्या वरील बाजुस अडकल्याचे डॉ. मुथा यांनी केलेल्या एक्स-रे मध्ये दिसुन आले. त्यानंतर डॉ. मुथा यांनी तातडीने कान-नाक-घशाचे तज्ज्ञ डॉ. वैभव मदने, भुलतज्ज्ञ डॉ. अमर पवार यांच्याशी संपर्क साधत त्यांची मदत घेतली व दुर्बिणीद्वारे ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत चाव्यांचा जुडगा काढत आरुषला जीवदान दिले.

हे देखील वाचा-

लहान मुले घरामध्ये खेळत असताना दिसेल ती वस्तू गिळण्याचा प्रयत्न करत असतात. घरातील वस्तूही गुंतून लहान मुलांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे गृहिणींनी घरामध्ये लहान मुलांपासुन लोखंडी, टोकदार वस्तू, रासायनिक औषधे दूर ठेवावीत. सोशल मिडियात पालक गुंतून पडल्याने झालेले दुर्लक्ष बालकांसाठी धोकादायक ठरते आहे.
                                                     – डाॅ. राजेंद्र मुथा, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, बारामती

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram