अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर
"माझे कार्यालय जागरूक कार्यालय"

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर
“माझे कार्यालय जागरूक कार्यालय”
बारामती वार्तापत्र
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा, परिसरातील नागरिकांनी मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, गटविकास अधिकारी अनिल बागल, यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, क्षेत्रीय अधिकारी (सेक्टर ऑफीसर) आणि स्विप पथकाचे सदस्य उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. नावडकर यांनी मतदान जनजागृतीच्याअनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि नागरिकांचा निवडणुकी सक्रिय सहभाग वाढवून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले. मतदानाच्या जागरूकतेकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे वाहनही त्यांनी केले.
यावेळी मतदान करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे शपथ दिली तसेच कार्यालय प्रमुखांना “माझे कार्यालय जागरूक कार्यालय” या संकल्पपत्राचे वितरण करण्यात आले.