अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेत भजनास अधिक महत्त्व- अंकिता पाटील
इंदापूर तालुक्यातील पाच गावांना भजन साहित्याचे वाटप

अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेत भजनास अधिक महत्त्व- अंकिता पाटील
इंदापूर तालुक्यातील पाच गावांना भजन साहित्याचे वाटप
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील पाच गावांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
अंकिता पाटील म्हणाल्या की,’ पुणे जिल्हा परिषद निधीतून मंजूर झालेल्या भजनी मंडळ साहित्याचे वाटप महादेव मंदिर भजनी मंडळ बावडा (घोगरे वस्ती), शिवशंभु भजनी मंडळ भाटनिमगाव (तावडे वस्ती), नवनाथ भजनी मंडळ भरणेवाडी, रासाई माता मंदिर भजनी मंडळ शेटफळगडे व श्रीराम महिला भजनी मंडळ बाभूळगाव या सर्व भजनी मंडळांना प्रदान केले. या भजनी साहित्यामध्ये पकवाज, वीणा, टाळ, मृदुंग यांचा समावेश आहे.
संत साहित्याची परंपरा जोपासण्यासाठी तसेच अध्यात्मिक विचारांच्या जडणघडणीमध्ये गावातील भजनास असणारे महत्त्व लक्षात घेता सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी गावातील भजनी मंडळास भजन साहित्य उपलब्ध करून दिले अशी माहिती अंकिता पाटील यांनी दिली.गावातील भजनी मंडळास भजन साहित्य उपलब्ध झाल्याने गावातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.