अनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता
पाचव्या टप्प्याच्या कालावधीत नवरात्रौत्सव, दसरा असे सणही येत आहेत
अनलॉक-५ : मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होण्याची शक्यता
पाचव्या टप्प्याच्या कालावधीत नवरात्रौत्सव, दसरा असे सणही येत आहेत.
नवी दिल्ली;बारामती वार्तापत्र
अनलॉकचा चौथा टप्पा ३० सप्टेंबरला संपून १ आॅक्टोबर पासून पाचव्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या नव्या टप्प्यात सिंगल स्क्रिन, मल्टिप्लेक्स थिएटर तसेच नाट्यगृहे पुन्हा सुुरू करण्यास केंद्र सरकार परवानगी देण्याची तसेच आणखी पर्यटनस्थळे खुली होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे देशातील सात राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा केलेल्या चर्चेमध्ये पंतप्रधानांनी मायक्रो-कंटेनमेन्ट झोन स्थापन करण्याची संकल्पना मांडली.
चौथ्या टप्प्यामध्ये काही ठिकाणची मेट्रो रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले.
देशातील सर्व शाळा, महाविद्यालये कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद आहेत. पाचव्या टप्प्याच्या कालावधीत नवरात्रौत्सव, दसरा असे सणही येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पूवीर्पेक्षा अधिक प्रमाणात निर्बंध शिथील करेल असे म्हटले जाते.