मुंबई

अनुंकपा तत्त्वावरील भरतीत उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

प्रकल्पग्रस्तांच्या रिक्त जागांचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश

अनुंकपा तत्त्वावरील भरतीत उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

प्रकल्पग्रस्तांच्या रिक्त जागांचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई, बारामती वार्तापत्र रिपोर्ट

अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना न्याय देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने ही भरती जलदगतीने व्हावी तसेच सध्याच्या प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेता यावे यासाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावाअसे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. प्रकल्पग्रस्त आरक्षणांतर्गत रिक्त जागांचा अहवाल महिन्याच्या आत सादर करावा अशा सूचनाही श्री. भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अनुकंपा तत्त्वावरील भरती तसेच प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या भरतीच्या अनुषंगाने शिष्टमंडळांनी श्री. भरणे यांची मंत्रालयात भेट घेतली. आमदार प्रकाश आबीटकरसामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णीउपसचिव टिकाराम करपते आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी विविध मागण्या सादर केल्या. रिक्त पदांची अनुपलब्धता किंवा भरतीसाठी कमी उपलब्ध होत असल्याने अनुकंपा तत्त्वावरील भरती बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत 10 हजारावर उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. अनुकंपा तत्त्वावरील सर्व उमेदवारांना भरतीमध्ये लवकरात लवकर सामावून घेण्यासाठी सन 2008 मध्ये सलग तीन वर्षात 50 टक्के25 टक्के आणि 25 टक्के अशा पद्धतीने सामावून घेण्यासाठी शासन निर्णय झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा तशा पद्धतीचा शासन निर्णय करून अंमलबजावणी करण्यात यावीआदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर उमेदवारांना जलदरितीने सामावून घेण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळापुढे सादर करण्यासाठी प्रस्ताव तयार करावात्याबाबत सकारात्मक विचार केला जाईलअसे श्री. भरणे यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकीयनिमशासकीय सेवेत समांतर आरक्षण असून त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी सर्व विभागातील या घटकासाठीच्या रिक्त जागांची माहिती एक महिन्याच्या कालावधीत सादर करावी. या उमेदवारांना पुढील भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घेण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईलअसेही श्री. भरणे यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!