अनेकान्तचे बाल एकांकिका सादरीकरण….
५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, पुणे येथे संपन्न

अनेकान्तचे बाल एकांकिका सादरीकरण…
५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, पुणे येथे संपन्न
बारामती वार्तापत्र
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई तसेच श्री. शिवाजी मराठा सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, पुणे येथे संपन्न झाले. संमेलनात अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
तसेच सदर संमेलनात श्री बालगणेश जन्मकथा या एकांकिकेसाठी स्कूलला व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट नाट्यकथा, सादरीकरण, उत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, वेशभूषा त्याबद्दल नामवंत साहित्यिकांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच या एकांकिकेचे दिग्दर्शन व संवाद-लेखन स्कूलच्या मराठी शिक्षिका सौ. दीक्षा मालगुंडकर यांनी केले होते. यांचाही उत्कृष्ट दिग्दर्शक व संवाद- लेखन म्हणून सदर संमेलनात साहित्यिकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या संमेलनात मिळालेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी अभिनयाची व साहित्य वाचनाची आवड निर्माण झाली आहे.