अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा.
इंग्रजी माध्यमाला सीबीएसई ची मान्यता.
बारामती:वार्तापत्र अनेकांनत एजेकुशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलला नुकतीच केंद्रीय माध्यमिक बोर्डाची (सीबीएसई) मान्यता प्राप्त झाली आहे.
बारामतीत सन 2012 पासून अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूलची मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थाने पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक दर्जेदार शिक्षणाचे दार नव्या पिढीपुढे उपलब्ध करून दिले. सध्या स्कूलमध्ये 1200 हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्कूलमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच, मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात सर्जनशीलता व उपक्रमशीलता निर्माण व्हावी, या दृष्टीने नाविन्यपूर्ण शिक्षणावर भर दिला जात आहे.
लॉकडाउनच्या कालावधीतही सर्व शाळा बंद असताना देखील स्कूलने विद्यार्थ्यांसाठी ‘टेनो ऍप’द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून, विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेत आहेत. विविध वर्गांची प्रवेश प्रक्रिया देखील ऑनलाईन सुरु आहे, अशी माहिती अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष मिलिंद शहा (वाघोलीकर) यांनी दिली.
सीबीएससी मान्यतेचा समस्त बारामती व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी ग्वाही अनेकांत स्कूलच्या प्राचार्या राखी माथूर यांनी दिली. सीबीएसई मान्यता घेणेकामी संस्थेचे सचिव जवाहर शहा (वाघोलीकर) यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अनेकांत स्कूलचे सर्व विश्वस्त यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सर्व पालक ,अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.