अनेकान्त स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले

अनेकान्त स्कूलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचलित अनेकान्त
इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दि. ०७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत विद्यार्थांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
करण्यात आले.
यामध्ये बालरोगतज्ञ डॉ. भास्कर जेधे व सहकारी,
दन्तरोगतज्ञ डॉ. केतकी नाळे व सहकारी, नेत्ररोगतज्ञ डॉ. जयपाल चोपडे व सहकारी तसेच डॉ. दिप्ती काळे व सहकारी, दन्तरोगतज्ञ
डॉ. जुई चिराग शहा (मुंबईकर) हे उपस्थित होते.
आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले असून आपले आरोग्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत असे डॉक्टरांनी सांगितले. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष,सचिव तसेच शाळा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रवदन शहा(मुंबईकर), यांनी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.