अन् हर्षवर्धन पाटलांनी मारली खासदार संजय राऊत यांना मिठी
खासदार राऊत इंदापूर येथे खासगी कामानिमित्त आले असता झाली भेट..
अन् हर्षवर्धन पाटलांनी मारली खासदार संजय राऊत यांना मिठी
खासदार राऊत इंदापूर येथे खासगी कामानिमित्त आले असता झाली भेट..
इंदापूर:प्रतिनिधी
शिवसेनेचे राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार संजय राऊत हे आज (दि.२१) रोजी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका खाजगी कामानिमित्त आले असता महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील व खासदार संजय राऊत यांची गळाभेट पहावयास मिळाली.
सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री विरुद्ध भारतीय जनता पार्टी मधील मंत्र्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी व विळ्या भोपळ्याचे वैर पहावयास मिळत असतानाच मात्र इकडे इंदापूर मध्ये शिवसेनेच्या खासदाराला भाजपच्या नेत्याने मिटी मारल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या गळा भेटीवरून हर्षवर्धन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की,संजय राऊत हे आमच्या मतदार संघात आले आहेत ते आमचे जूने मित्र आहेत.आपल्या भागात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपलं काम आहे. त्यांची पद्धत आहे गळा भेटीची म्हणून त्यांची आणि माझी गळाभेट झाली.