राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोविड सेंटर मध्ये जाऊन केली पाहणी.
रुग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोविड सेंटर मध्ये जाऊन केली पाहणी.
रुग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस.
बारामती:-प्रतिनिधी
इंदापूर कोविड केअर सेंटर मधून काल एका रुग्णांने तेथील असणाऱ्या परस्थिती चा व्हिडीओ काढून प्रसारीत केला होता.तो व्हिडीओ संपूर्ण तालुक्यात वायरल झाला असता.
आज दि.1 ऑगस्ट रोजी तालुक्याचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्याची बैठक घेऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना केल्या.या नंतर दत्तात्रय भरणे यांनी स्वतः कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन सर्व पाहणी करून रुग्णांना विचारपूस केली.
या पुर्वीही राज्यमंत्री भरणे यांनी सोलापूर या ठिकाणी कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली होती.त्यामुळे एक जबाबदार मंत्री म्हणून भरणेंनी केलेल्या कामाचे कौतुक सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
इंदापूर तालुक्यातील वाढणारा रुग्णांचा आकडा बघता भिगवण व निमगाव केतकी या ठिकाणी कोविड केअर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात असून अवघ्या काही दिवसातच त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येणार असून इंदापूर येथील कोविड केअर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण कमी पडणार असून तालुक्यातील अन्य भागातून इंदापूर येथे येणाऱ्या रुग्णांना तेथे उपचार करणे सोयीस्कर असल्याचे मत यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी केले.