अपंग व दिव्यांग बांधवांच्या समस्यांसंदर्भातील कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदेच्या लढ्यास यश.
गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या सोबत झालेल्या बैठकीत अनेक विषय मार्गस्थ लावण्याची दिली ग्वाही.
अपंग व दिव्यांग बांधवांच्या समस्यांसंदर्भातील कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदेच्या लढ्यास यश.
गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या सोबत झालेल्या बैठकीत अनेक विषय मार्गस्थ लावण्याची दिली ग्वाही.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सोमवार दि.९ रोजी इंदापूर पंचायत समितीच्या हॉल मध्ये गटविकास अधिकारी व तालुक्यातील ग्रामसेवकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत अपंग व दिव्यांगांच्या विविध अडचणी संदर्भात लढा देत असलेल्या शेतकरी कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदेच्या अनेक मागण्या व दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.
अपंग आणि दिव्यांगांच्या अडचणी व प्रलंबित मागण्यांसंदर्भात शेतकरी कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदेच्या वतीने अनेकवेळा संबंधित कार्यालयास वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात होते. परंतु संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे दि.९ रोजी गटविकास अधिकारी व तालुक्यातील ग्रामसेवकांच्या सोबत संघटनेची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत तालुक्यातील दिव्यांग व अपंग बांधवांना कायदे योजना यासंदर्भातील माहिती मिळावी याकरिता पंचायत समितीमध्ये एक विशेष बाब म्हणून मार्गदर्शक केंद्र कार्यान्वित करावे व अपंग बांधवांसाठी असणारा ५ टक्के निधी सन २०१७-१८ व २०१८ ते २०२० पर्यंतचा देण्यात यावा,तसेच ग्रामपंचायत पातळीवरील गाळ्यांमध्ये दिव्यांगांना सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे तसेच अंत्योदय योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा व दक्षता समितीमध्ये दिव्यांग,अपंग बांधवांना समाविष्ट करून घ्यावे इत्यादी व अन्य मागण्या संघटनेच्यावतीने यावेळी उपस्थित करण्यात आल्या.
या सदरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व मार्ग काढून अपंगांना लवकरात लवकर न्याय मिळेल व त्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी ग्वाही गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,विस्तार अधिकारी मोरे,इंदापूर तालुक्यातील ग्रामसेवक, कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सागरबाबा मिसाळ,अमोल जगताप,बाळासाहेब सोनवणे,कल्पेश यादव,पिंटू नरुटे,शेखर काटे व अन्य उपस्थित होते.