अपर जिल्हाधिकारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
यावेळी महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या कामांची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली .
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/10/9511c9c9-3145-4ea7-9822-ed6426bc53cb-780x470.jpg)
अपर जिल्हाधिकारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
यावेळी महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या कामांची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली .
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील विकास कामांचा आढावा व कोरोनाची सद्यस्थिती याबाबतची बैठक आज अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती , बारामती येथील सभागृहात पार पडली.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, उपविभागीय अभियंता जि.प. (बांधकाम) उपविभाग,बारामती आर.ए.कोकणे, सिल्व्हर जुबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, मेडीकल कॉलेजचे उप अधिष्ठाता डॉ.यशवंत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण प्रकाश देवकाते, सहाय्यक निबंधक एस.एस.कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे , तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी देशमुख यांनी बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ सद्यस्थितीबाबत व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे आणि उपअधिष्ठाता कुलकर्णी यांच्याकडून घेतली. बारामती मध्ये सुरू असलेली विकास कामे – साठवण तलाव, स्मशानभूमी , दफनभूमी , ड्रेनेज, रस्ते, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, नगरपालिका हद्दीतील चौक सुशोभिकरण, रिंग रोड, नीरा डावा कालवा सुशोभिकरण व त्यावरील सायकल ट्रॅक, ओपन जिम, नाना-नानी पार्क, विश्राम गृहाचे विस्तारीकरण, रूई, तांदूळवाडी व जळोची हद्दीतील रस्ते व क्रीडा विषयक विकासकामांची सादरीकरणाव्दारे माहिती घेवून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची एकत्रित माहिती सादर करण्यास सांगून महसूल विभागाने केलेल्या 75 टक्के पंचनाम्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या कामांची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली . पावसामुळे तालुक्यातील झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबतची माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी शासनाच्या सुरू असलेल्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या कामकाजाविषयक माहिती दिली.