अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांना दिलेले आदेश रद्द करण्याची स्वाभिमानी शिक्षक परिवाराची मागणी
इंदापूरच्या तहसीलदारांसह गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन

अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांना दिलेले आदेश रद्द करण्याची स्वाभिमानी शिक्षक परिवाराची मागणी
इंदापूरच्या तहसीलदारांसह गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
अपात्र शिधापत्रिका शोध मोहीमे अंतर्गत प्राथमिक शिक्षकांना काढलेले आदेश रद्द करण्याबाबत स्वाभिमानी शिक्षक परिवार इंदापूर तालुका यांच्याकडून मागणी करण्यात आली असून या मोहिमेवर बहिष्कार टाकत असल्याबाबतचे संबंधित प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात व शैक्षणिक वर्षाखेरीस असलेल्या विविध शैक्षणिक कामांचा शिक्षकांवरती प्रचंड व्याप व तणाव आहे. वार्षिक तपासणी, ऑनलाइन तासिका, विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, सर्वेक्षण, प्रशिक्षणे इत्यादी वरील बाबींचा विचार करता दिलेल्या आदेशातील कामकाज करणे शिक्षकांना अशक्य आहे. तरी १९७ प्राथमिक शिक्षकांचे काढलेले आदेश रद्द करण्यात यावेत. सदरील कार्यक्रमावर स्वाभिमानी शिक्षक परिवार बहिष्कार टाकत आहे अशा आशयाचे लेखी निवेदनात म्हंटले असून सदरील पत्र इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांसह गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,गट शिक्षणाधिकारी श्री.बामणे यांना देण्यात आले आहे.
यावेळी सुहास मोरे,संतोष गदादे,दत्तात्रय ठोंबरे, बालाजी कलवले,शशिकांत शेंडे,संतोष घोडके, रामदास पाडुळे, प्रशांत घुले,रामचंद्र शिंदे,उज्ज्वलकुमार सुतार,समीर मुलाणी,सुरेश घोळवे,दिनेश काळे हे उपस्थित होते.