अमरावतीध्ये बंदच्या आडून सुनियोजित पद्धतीनं दंगल घडविण्याचा भाजपचा डाव होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक
अमरावतीमध्ये दोन समुदायांमध्ये दंगा झाला नव्हता
अमरावतीध्ये बंदच्या आडून सुनियोजित पद्धतीनं दंगल घडविण्याचा भाजपचा डाव होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक
अमरावतीमध्ये दोन समुदायांमध्ये दंगा झाला नव्हता
प्रतिनिधी
“रझा अकादमीच्या लोकांशी आशिष शेलार मिटींग करत होते. यासंदर्भातला माझ्याकडे फोटो आहे. आशिष शेलार तिथे काय करत होते, याचा खुलासा त्यांनी करावा,” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
नवाब मलिक यांनी आज (15 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन अमरातीमधील हिंसाचार हा सुनियोजित असल्याचा आरोप केला.
- त्रिपुरात नेमकं काय घडलं होतं ज्याचे पडसाद अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये उमटले?
- अमरावती हिंसाचाराबाबत चंद्रकांत पाटलांचे विधान, ‘हिंदू मार नही खाएगा’ अशी स्वाभाविक प्रतिक्रिया
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, शनिवारी (13 नोव्हेंबर) अमरावतीमध्ये भाजपकडून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. “मात्र बंदच्या आडून सुनियोजित पद्धतीने दंगल घडविण्याचा भाजपचा डाव होता, जो पोलिसांनी उधळून लावला,” असा दावा त्यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये दोन समुदायांमध्ये दंगा झाला नव्हता, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.
“भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि अन्य नेत्यांनी अमरावीमध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन 2 नोव्हेंबरलाच केला होता. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे,” असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
“भाजपचा हा हातखंडा आहे. सर्व उपाय थकले की, दंगलींचं हत्यार बाहेर काढून राजकारण केलं जातं,” असाही आरोप मलिकांनी केला.
‘तो’ राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही
दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याची चर्चा आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचं मलिक यांनी म्हटलंय.
मलिक यांनी सांगितलं की, आमदार मुफ्ती यांनी 2014ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. नंतर काँग्रेससोबत राष्ट्रवादीची युती झाली. त्यामुळे मालेगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने मुफ्ती हे एमआयएमसोबत गेले.
त्यांच्यासोबत इतर नगरसेवकही गेले. कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत, असंही मलिक यांनी म्हटलंय.