अमित शहांचा इंदापूरात निषेध
इंदापूर शहरात आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन

अमित शहांचा इंदापूरात निषेध
इंदापूर शहरात आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन
इंदापूर प्रतिनिधी –
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर येथे संविधान प्रेमींनी शहरातून अमित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून, जोडे मारो आंदोलन केले. तसेच अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.20) डिसेंबर रोजी इंदापूर शहरातील आंबेडकरनगर येथील जेतवन बुद्ध विहारापासून मुख्य बाजारपेठेतून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच, इंदापूर बस स्थानकासमोर संविधानप्रेमी कार्यकत्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
या आंदोलनामध्ये अॅड. राहुल मखरे, शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे, संदीपान कडवळे, सागर मिसाळ, कैलास कदम, रमेश शिंदे, बाबाजी भोंगे, अमोल मिसाळ, अॅड. सूरज मखरे, प्रा. बाळासाहेब मखरे, हनुमंत कांबळे, स्वप्नील मखरे, सुमीत सोनवणे, अॅड. किरण लोंढे, विकास भोसले, दत्तात्रेय पवार, बंटी सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.