अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कोठडीत मुक्काम आणखी वाढला,पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई कोर्टाची परवानगी
कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कोठडीत मुक्काम आणखी वाढला,पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई कोर्टाची परवानगी
कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
मुंबई, प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा ईडीच्या कोठडीत मुक्काम आणखी वाढला आहे. कोर्टाने नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, मलिक यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
कोर्टाने मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला. मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. तसंच घरचे जेवण देण्याची मागणी केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अहवाल पाहिल्यानंतर मंजुरी दिली जाईल.
नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?
नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या मंत्रालयातील खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं 2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव हे नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे. तसंच, परभणीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.