महाराष्ट्र

अवघ्या काही रुपयात मिळणार कोरोना लस; पुणे सीरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत.

जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सुरू आहे.

अवघ्या काही रुपयात मिळणार कोरोना लस; पुणे सीरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत

जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सुरू आहे.

लवकरात लवकर कोरोना लस (Corona vaccine) तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अशी परवडणारी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आता आणखी एक पाऊल उचललं आहे.

सीरम इन्स्टिट्युटने GAVI या आंतरराष्ट्रीय लस संस्थेशी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही संस्था मिळून भारतासह इतर गरीब देशांसाठी 2021 पर्यंत 100 दशलक्ष कोरोना लशीचं उत्पादन करतील. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. सीरम इन्स्टिट्युटने ही माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram