असा होतो दरवर्षीचा गडचिरोलीतील आगळा वेगळा सर्जिकल कॅम्प
स्थळ .शोधग्राम,गडचिरोली.सर्च सर्जिकल विलेज
असा होतो दरवर्षीचा गडचिरोलीतील आगळा वेगळा सर्जिकल कॅम्प
स्थळ .शोधग्राम,गडचिरोली.सर्च सर्जिकल विलेज
बारामती वार्तापत्र
आता पर्यंत आपणा सर्वाना पद्मश्री डॉ अभय बंग आणि डॉ राणी बंग यांचे समाजाभिमुख कार्य माहिती झाले आहे. आदिवासी आणि नक्षलवादी प्रभावित गडचिरोली भागात गेली साडेतीन दशक हे दाम्पत्य या बांधवांच्या सर्वांगीण विकास,आरोग्य,व्यसनमुक्ती साठी झटत आहे.त्याच्या या कार्याची दखल देशपातळीवर घेऊन त्यांना पद्मश्री हा बहुमान भारत सरकारने बहाल केलेला आहे.
या दुर्गम भागातील बांधवांच्या आरोग्यविषयक सर्जिकल अडचणीं साठी दरवर्षी कॅम्प चे आयोजन केलेले असते.यामधे आंध्रप्रदेश,तेलंगणा, छत्तीसगड,महाराष्ट्र च्या सीमेवर दूर राहणार्या आदिवासी बांधवांना फायदा होतो.
या वर्षी नुकताच हा कॅम्प झाला.सातारा जिल्ह्यातील कोरेगावस्थित स्त्रीआरोग्यज्ञ डॉ मिलिंद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील काही डॉक्टर दरवर्षी
यात सहभागी होत असतात.
या कॅम्प मध्ये कॅन्सर,स्त्रियांचे आजार,गुंतागुंतीच्या सर्जरी, लहान मुलांच्या सर्जरी, प्लास्टिक सर्जरी,जनरल सर्जरी होतात.
या कॅम्पमध्ये सर्जन म्हणुन डॉ गिरीश पेंढारकर,डॉ शशिकांत पवार,डॉ प्रमोद राजभोई,डॉ अमित मांढरे,डॉ जिवन लाहोटी यांनी तसेच स्त्री आरोग्यतज्ञ म्हणुन डॉ मिलिंद शाह,डॉ परमाणे,डॉ माणिक गुर्रम,डॉ मिसेस गुर्रम,डॉ अभिजित सुर्यवंशी यांनी काम केले.राजु मुलाणी हे सहायक
तर भूलतज्ज्ञ म्हणुन बारामतीचे डॉ सुजित अडसूळ, विटा येथील डॉ वैभव माने व वाई मधील डॉ विद्याधर घोटावडेकर यांनी जबाबदारी पहिली.दरवर्षी या मध्ये सेवाभावी वृत्तीने
डॉ संदिप श्रोत्री,डॉ अरुणा रसाळ व इतर नामांकित डॉक्टर सहभागी होतात.
डॉ मिलिंद शाह,(पथक प्रमुख)
डॉ अभय बंग आणि डॉ राणी बंग यांचे आरोग्य सेवेतील कार्य खूप मोठे आहे.अणि ते समाजापर्यंत पोहोचणे हे महत्वाचे आहे.या आरोग्य वारी तून मिळणारा आनंद अवर्णनीय व
बहुमूल्य असतो.डॉ सुजित अडसूळ,(भूलतज्ञ, बारामती) …
गेली अनेक वर्षे आम्ही सर्वजण यात सहभागी होत आहोत.दुर्गम भागात एक भुलतज्ञ म्हणुन काम करताना वेगळी आव्हाने असतात.
आपल्या ज्ञान,अनुभव आणि कौशल्याचा उपयोग समाजा तील शेवटाच्या घटका पर्यंत होतो यांचे समाधान वाटते.
या सर्व टीम चे पद्मश्री डॉ राणी बंग यांनी विशेष कौतुक केले.