आंबेडकर पुतळा स्मारक येथे जिजाऊ जयंती उत्साहात

आंबेडकर पुतळा स्मारक येथे जिजाऊ जयंती उत्साहात
बारामती वार्तापत्र
येथील शेरसुहास मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर आणि महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माँसाहेब जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा घेत प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना देखील योग्य दिशा दाखवली पाहिजे असं मत व्यक्त करत.राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या क्रांतिकारी इतिहासाला उजाळा देत.माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,ॲड.निलम अहिवळे,प्रा.सेजल अहिवळे यांनी उपस्थितींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.तर चिमुकल्या स्वरा सिद्धार्थ लोंढे हिने देखील छोटस भाषण करत जिजाऊंना अभिवादन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अहिवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विश्वास लोंढे यांनी केले.यावेळी लाडू वाटप करत उपस्थितांचे तोंड गोड करण्यात आले.
याप्रसंगी,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष विकास खोत,ॲड.सुशिल अहिवळे,गौतम शिंदे,प्रा.शिल्पा घोडके,प्रा.अस्मिता शिंदे,सुरज लोंढे,संतोष लोंढे,नितीन गव्हाळे,प्रितम गुळुमकर,रितेश गायकवाड,मिलिंद शिंदे,अजय शेळके,सुरज जाधव,रोहित वाघमोडे,पुजा लोंढे,सौरवी अहिवळे,भावना अहिवळे,राजश्री अहिवळे,श्रेया लोंढे,प्राजक्ता लोंढे यांच्यासह आदी उपस्थित होते.