आकडे घसरले तरी कोरोनाचा प्रभाव कायम नागरिकांनी काळजी घेण्याची गरज.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३६५९ वर गेली आहे.
आकडे घसरले तरी कोरोनाचा प्रभाव कायम…नागरिकांनी काळजी घेण्याची गरज.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३६५९ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (९\१०२०२०) एकूण rt-pcr नमुने १४४. एकूण पॉझिटिव्ह- १६. प्रतीक्षेत ०. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१४ त्यापैकी पॉझिटिव्ह -06 कालचे एकूण एंटीजन ४१. एकूण पॉझिटिव्ह-०५ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १६+०६+०५ = २७. शहर-०७ . ग्रामीण- २०. एकूण रूग्णसंख्या-३६५९ एकूण बरे झालेले रुग्ण-३११२ एकूण मृत्यू– ९९.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत स्टेशन रोड येथील ५४ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ८५ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील ४८ वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील २४ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, ७१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
सुपेनजिक खैरेपडळ येथील ४४ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, १८ वर्षीय महिला, पणदरे येथील ५६ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, आंबी बुद्रुक येथील ३० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय अॅंटिजेन तपासणीत बारामती शहरातील २८ वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील ५६ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील ७२ वर्षीय महिला, जळोची येथील २७ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरीने केलेल्या आरटीपीसीआर तपासणीत वाणेवाडी येथील ६६ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २५ वर्षीय पुरूष, लाटे येथील ५४ वर्षीय पुरूष, सोमेश्वरनगर येथील ५१ वर्षीय पुरूष,जळोची येथील ७० वर्षीय पुरूष, रुई येथील ८० वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत