आगोती नं.1 च्या विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून पाहिजे ती मदत:-गटविकास अधिकारी विजयकुमार परीट.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने एक हजार वृक्षांचे रोपण.

आगोती नं.1 च्या विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून पाहिजे ती मदत:-गटविकास अधिकारी विजयकुमार परीट.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने एक हजार वृक्षांचे रोपण.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यातील अगोती गाव हरित करण्यासाठी,सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून तब्बल 1000 वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ झाला असल्याने,पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे.तर आगामी काळात हेच गाव आदर्श निर्माण होईल असा आशावाद इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केला.
अगोती गावामध्ये 1000 वृक्ष लागवडीचा प्रारंभ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका नीलकंठ मोहिते,पत्रकार संघाचे मुख्य सागर शिंदे,इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट बोलत होते.
पुढे बोलताना विजयकुमार परीट म्हणाले की,गावाचे खऱ्या अर्थाने वैभव वृक्ष रस्ते असून यामध्ये वृक्ष लागवड करण्याची संकल्पना,ग्रामीण भागात निर्माण होण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे.गावातील नागरिकांना स्वच्छ व सुंदर हवा,वातावरण या झाडांच्या माध्यमातून मिळण्यासाठी मदत होणार आहे.शासनाच्या माध्यमातून या गावाला पाहिजे ती विकास कामासाठी मदत केली जाईल अशीही ग्वाही गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.
यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते मुख्य सचिव सागर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.तंटामुक्ती अध्यक्ष रामदास घनवट,सामजिक कार्यकर्ते लक्ष्मण गुणवरे,सरपंच मोनाली दळवी, उपसरपंच सुनील शिंदे,ग्रामसेवक बालाजी निलेवाड, पोलीस पाटील रेश्मा गुणवरे, मुख्याध्यापक बालाजी कलवले, गावकरी ग्रामपंचायत सदस्य कौशल्य गुणवरे, सामजिक कार्यकर्ते विनोद दळवी,नंदकुमार भोसले, सुखदेव गुणवरे, दिलीप गुणवरे आदी उपस्थित होते.