आजादी का सुवर्ण महोत्सव ” उपक्रमाचा समारोप समारंभ दि. २८ नोव्हेंबर रोजी कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात होणार संपन्न :
एकाच छताखाली नागरिकांना मिळणार विविध सेवा सुविधा
आजादी का सुवर्ण महोत्सव ” उपक्रमाचा समारोप समारंभ दि. २८ नोव्हेंबर रोजी कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात होणार संपन्न :
एकाच छताखाली नागरिकांना मिळणार विविध सेवा सुविधा
बारामती वार्तापत्र
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आहेत, यानिमित्त संपूर्ण देशामध्ये “ आजादी का सुवर्ण महोत्सव ” साजरा केला जात आहे. यानिमित्त विधी सेवा समिती, बारामती व बारामती वकील संघटना, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक दिवस कायदे विषयक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविले जात आहेत.
यामध्ये समाजातील शेवटच्या घटकाला कायद्याची माहिती व्हावी नागरिकांना आपले हक्क व अधिकार समजावेत कायद्याबद्दलची भीती न वाटता कायद्याचा वापर कसा करावा याबाबत समाजातील शेवटच्या घटका पर्यंत जाऊन विविध कायद्यांची माहिती देण्याकरिता कायदेविषय शिबिरे आयोजित केली गेली. महिलांवरील अत्याचाराबाबत महिलांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांची माहिती महिलांना व्हावी या करिता तीन हत्ती चौक, इंदापूर चौक व विद्यानगरी चौक या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या पथनाट्याच्या सादरीकरनावेळी देखील न्यायाधीश मंडळी स्वतः रस्त्यावर उतरून जनजागृती करताना पहावयास मिळाली.
या “ आजादी का सुवर्ण महोत्सव ” उपक्रमाचा समारोप समारंभ रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी कविवर्य मोरोपंत नाट्यगृह, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारोप समारंभास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार असून याच बरोबर मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश,पुणे देखील उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कविवर्य मोरोपंत नाट्यगृहा बाहेरील पटांगणामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे स्टॉल सर्वसामान्य नागरिकांकरीता लावले जाणार आहेत. या स्टॉलवर नागरिकांना शासनाकडे दैनंदिन गरजे करीता लागणाऱ्या सुविधा जसे की आधार कार्ड, वाहन परवाना, ७ x १२ उतारा, निराधार योजनेची प्रकरणे, जिल्हा परिषदे मार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व वाटप, शासकीय कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात तसेच कायदेशीर कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. विधी सेवा समिती मार्फत गरजू लोकांसाठी असणाऱ्या विविध योजना त्याची माहिती, मा. सर्वोच न्यायालय व मा. उच्चन्यायालयाच्या निर्देशांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणार आहे.
अशाप्रकारे शासनाच्या विविध खात्यांच्या सेवा व त्याच ठिकाणी सुविधा तत्काळ पुरविल्या जाणार आहेत.
तरी गरजूंनी या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी कविवर्य मोरोपंत नाट्यगृह, प्रशासकीय इमारतीसमोर, बारामती येथे स. १०.०० वा. उपस्थित रहावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मा. भालेराव बारामती व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष मा. ॲड. चंद्रकांत सोकटे यांनी केले आहे. यांनी केले आहे. या बाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मा. भालेराव साहेब व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष मा. ॲड. चंद्रकांत सोकटे, उपाध्यक्ष ॲड. स्नेहा भापकर, ॲड. एस.एन. बापू जगताप, ॲड.अजित बनसोडे, ॲड.राजेंद्र काळे, ॲड.अमर महाडीक, ॲड.धैर्यशील जगताप, ॲड.रमेश कोकरे, ॲड.धीरज लालबिगे, ॲड.कमलाकर नवले, ॲड. सुनील वसेकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बारामती येथील वकील वर्ग सतत क्रियाशील आहे.