राजकीय

आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये,” अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर बोचरा वार

आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये,” अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर बोचरा वार

अहमदनगर : बारामती वार्तापत्र रिपोर्ट 

“गेल्या 50 वर्षांपासून देशाचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. पण या मतदारसंघातील रस्त्यांवर खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे रोहित दादांनी इतरांना मोठमोठे सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते पाहावेत. आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये,” अशी बोचरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. (Gopichand Padalkar Criticism on Rohit Pawar) पहा VIDEO 

YouTube player

गोपींचद पडळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

“सध्याचे ५० वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत.”

“रोहित पवार रोज टीव्हीवर, ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात.”
“रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल. हा मिरज गावातील रस्ता आहे. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल तर ते सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे.”
“या रहदारीत तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्जत विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत आणि चांगले करावेत आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!