आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.
ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.
ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
त्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं आहे.
1. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून एकदा अतिवृष्टी झाली होती.
2. आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपये विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना दिले आहेत यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा समावेश आहे.
3. निसर्ग चक्रीवादाळाचे 1065 कोटी केंद्राकडे केली आहे. अद्याप पैसे आले नाहीत. पूर्व विदर्भात पूर आला त्यावेळचे 800 कोटी रुपये थकित आहे, एकूण 38 हजार कोटी केंद्राकडून येणं बाकी आहे.
4. केंद्राकडून नुकसावन पाहणीसाठी पथक आलेली नाही. तीनदा मागणी करूनही पथकं आलेलं नाहीये.
5. शेतीचं नुकसान होऊन सरकारनं 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवण्यात,येईल.
6. केंद्र सरकार नुकसान भरपाई म्हणून जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 6,800 प्रती हेक्टर देतं म्हणून आम्ही 10 हजार रुपये प्रती हेक्टर 2 हेक्टरपर्यंत देण्याचं मान्य केलं आहे. फळपिकांसाठी केंद्र सरकार 18000 मदत देतं ती 25,000 प्रतीहेक्टर आम्ही जाहीर करत आहोत.