आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी तब्बल एवढे अर्ज दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणूक
राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे
आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी तब्बल एवढे अर्ज दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणूक
राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे
बारामती वार्तापत्र
राज्यातील अग्रेसर असलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडून बारामती येथील राष्ट्रवादी कार्यालयात तर शेतकरी कृती समितीकडून तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले जात आहेत. काहीशी बिनविरोध दिशेने चाललेली ही निवडणूक सतिश काकडे यांच्या भूमिकेमुळे रंगतदार होणार आहे.
सोमेश्वरच्या कार्यालयात बाकी नसलेले दाखले घेण्यासाठी इच्छुक गर्दी करत असून, कारखान्याच्या वतीने अर्जासाठी लागणारे सर्व दाखले दिले जात आहेत. १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ फेब्रुवारीला अर्जाची छानणी होणार असून, २४ तारखेला अर्ज मागे घेता येणार आहेत. १२ मार्चला चिन्ह वाटप होणार असून, २१ ला मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार आहे. बारामती, पुरंधर, खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सुमारे २७ हजार ५०० सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कारखान्याचे संचालक पद मिळावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, तर काहींनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीकडून प्रत्येक गटात पन्नासच्या वर इच्छुक असून अनेक जण मलाच उमेदवारी मिळेल या आशेवर शेकडोंच्या संख्येने अर्ज दाखल करत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना हार पत्कारावी लागली आहे. तर काहिंनी आपले पॅनेल निवडणून आणत, दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत गेली त्यांचा पत्ता आपोआपच कट होईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र याचा निर्णय अजित पवार घेणार असल्याने त्यांच्या भूमीकेकडे लक्ष लागले आहे.
सुशिक्षित तरुणांना संधी
जुन्या नव्यांचा मेळ घालत आणि सुशिक्षित तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होत आहे. तसेच पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा सभासदांना आहे. त्यामुळे नेमकी कोणाला संधि मिळणार हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राष्ट्रवादीत बंडाची शक्यता
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी एकमेकांचे उट्टे काढले. आताही पुन्हा संधी आली आहे. सोमेश्वरच्या निवडणुकीत एका- एका गावात डझनभर इच्छुक आहेत. तिकिट मलाच मिळाले पाहिजे असा प्रत्येकाचा होरा आहे. संचालक मंडळाची संख्या कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादीत बंडाची शक्यता नाकारता येत नाही.