आज कोरोना पॉझिटिव्ह संख्या नऊ झाली आहे.
एकूण रुग्ण संख्या एकशे एकवीस.
बारामती:वार्तापत्र
बारामतीत काल घेतलेल्या 64 नमुन्यांपैकी 48 नमुने निगेटिव्ह आले होते तर सोहळा नमुने प्रतीक्षेत होते त्यापैकी बारामती तालुक्यातील 9 कोरोना बाधित आढळले आहे.
आज सकाळी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, तर पुण्यातील एक रुग्ण सोमेश्वर नगर येथे उपचार घेत असताना गंभीर परिस्थिती होऊन रुई येथे उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे, मात्र त्याची नोंद पुणे येथेच होणार आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याच्या एका शिपायास कोरोनाची लागण झाली असून बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्यांच्या पुतण्यासही कोरोनाची लागण झाली आहे. बर्हाणपूर येथील काल मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्त यांच्या संपर्कातील निकटच्या नातेवाईकांचा पैकी दोघेजण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
त्यामध्ये बारामती शहरातील 5 रूग्ण असून (भोई गल्ली बारामती येथील 26 वर्षाचा व 28 वर्षाचा युवक असे दोन व रुई येथील 22 वर्षाची महिला ,जळोची येथील 45 वर्षीय महिला व जामदार रोड येथील तीस वर्षाचा पुरुष असे शहरातील पाच व बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील 56 वर्षाचा पुरुष, शिर्सुफळ येथील 72 वर्षाचा पुरुष व बराणपुर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्ण असे एकूण नऊ रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत.