शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बारामतीतील रुग्णांची संख्या 296 झालेले आहे
माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आले कोरोना पाॅझिटिव्ह .
बारामती वार्तापत्र
बारामतीत काल दिवसभरात आणि रात्री उशीरा १३६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील सकाळी ५९ जणांचा आणि आता २५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आता आलेल्या अहवालात बारामती शहर आणि परिसरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये तांदूळवाडी, रुई पाटी आणि अशोकनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तर बारामती तालुक्यातील मूर्टी येथील एका व्यक्तीसह निंबूत येथील कंपनीतील एका कामगाराच्या खासगी प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या २९६ झाली आहे. अद्याप ४९ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे.