आज दत्त जयंती, मोठया उत्साहाने साजरी
आजच्या दिवशी श्री गुरुचरित्र, नवनाथ भक्तीकथासार ग्रंथ, जप अशा वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचनही या दिवशी केले जाते.
आज दत्त जयंती, मोठया उत्साहाने साजरी
आजच्या दिवशी श्री गुरुचरित्र, नवनाथ भक्तीकथासार ग्रंथ, जप अशा वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचनही या दिवशी केले जाते.
बारामती वार्तापत्र
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा: गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा I
आज दत्त जयंती श्रीगुरू दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून राज्यात मनोभावे पूजा करून साजरी केली जाते. ब्रह्मा विष्णू आणि महेश असं त्रिदेवांच स्वरूप श्री दत्तात्रयांच्या मूर्ती मध्ये पाहिले जाते.
संपूर्ण राज्यात तसेच ग्रामीण भागात अगदी छोट्या छोट्या मंडळाच्यावतीने ते मोठमोठ्या श्रीदत्तात्रयांच्या देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात देखील हा सोहळा साजरा केला जातो.
आजच्या दिवशी श्री गुरुचरित्र, नवनाथ भक्तीकथासार ग्रंथ, जप अशा वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचनही या दिवशी केले जाते. गुरु दत्तात्रेय आणि औदुंबर वृक्ष यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. औदुंबर वृक्षाच्या ठिकाणी श्री दत्तात्रयांचे वास्तव्य असते अशी ही कथा सांगितली जाते .त्यामुळे औदुंबर वृक्षाची ( उंबर ) पूजा केली जाते.
राज्यात औदुंबर ,नरसोबाची वाडी, गाणगापूर, दक्षिणेत आंध्र, कर्नाटकात तसेच तामिळनाडूत याच बरोबर छोटया स्वरूपातही दत्तगुरूंची देवस्थाने आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान ही केले जाते. तसेच ग्रामीण भागातही अगदी गल्लीत तसेच व्यावसायिकही दत्तजयंती मोठ्या आनंदाने साजरी करत असतात.