कोरोंना विशेष

आज बारामतीत तब्बल 38 जण अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.

काल बारामतीमध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

बारामतीतील आज 38 जण कोरोना बाधित ; खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी तालुक्यातील 23 जण कोरोना बाधित ; शासकीय तपासणीत 15 जण कोरोना बाधित.

खाजगी प्रयोगशाळेतील 23 तर शासकीय तपासणीत 15 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

काल बारामतीमध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.तर खंडोबानगर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा ग्रामीण रुग्णालय रुई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 23 झाली आहे.

खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत हरिकृपानगर येथील 34 वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 34 वर्षीय महिला, बुरुडगल्ली येथील 32 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 42 वर्षीय पुरुष, शहरातील कसबा येथील शहानुर मंजील मधील 42 वर्षे पुरुष, अनेकांत स्कूल शेजारील 34 वर्षीय पुरुष, कार्हाटी येथील 48 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 21 वर्षीय महिला, ढवाणवस्ती फलटण रोड येथील 22 वर्षे महिला, कॅनॉल रोड येथील 24 वर्षीय महिला, मूर्टी येथील 56 वर्षीय पुरुष, याच कुटुंबातील 63 वर्षीय महिला, 51 वर्षीय महिला व 63 वर्षीय महिला, पणदरे येथील तीस वर्ष महिला, सिनेमा रोड येथील 35 वर्षीय पुरुष, आमराई शिवाजीनगर येथील 32 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 74 वर्षीय पुरुष, आमराई येथील राजा अपार्टमेंट येथील 42 वर्षीय पुरुष, कॅनॉल रोड येथील 20 वर्षीय महिला, त्याच कुटुंबातील पन्नास वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

बारामतीत झालेल्या शासकीय तपासणीत 15 जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये कसबा येथील 65 वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज येथील 66 वर्षीय महिला व 34 वर्षीय महिला, ढेकळवाडी येथील 54 वर्षे पुरुष, तांबे नगर येथील 29 वर्षीय पुरुष, तुळजाराम चतुरचंद कॉलेज येथील 42 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 23 वर्षीय पुरुष, कसबा येथील 55 वर्षीय पुरुष, जळगाव कडेपठार येथील 41 वर्षे पुरुष व 43 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 56 वर्षीय महिला, कल्याणीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मेडद येथील साठ वर्षीय पुरुष येथीलच 32 वर्षीय महिला, देसाई येथील 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला त्यांचा समावेश आहे

बारामतीची रुग्ण संख्या 385 झालेली आहे तर मृतांची संख्या 23 झाली आहे.

नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन
”बारामतीमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातील तरुणांनी घरात आल्यानंतर सुद्धा ज्येष्ठ नागरिकांपासून अंतर ठेवून राहावे,  ज्य़ेष्ठ नागरिकांचा कोरोनापासून बचाव करता येणे शक्य होईल.”
डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!