आज बारामतीत 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
रुग्ण संख्या वाढतेय काळजी घेण्याचे प्रशासण चे आव्हान.

आज बारामतीत 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
रुग्ण संख्या वाढतेय काळजी घेण्याचे प्रशासण चे आव्हान.
बारामतीत आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बारामतीत कोरोना नव्वदीजवळ पोहचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ६९ पैकी ६४ जणांचे अहवाल आले असून पाचजणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
बारामतीत काल ६९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ६४ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सकाळी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर दुपारी आणखी तीनजण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने आलेल्या अहवालात शहरातील दोन आणि भिकोबानगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील जळोची येथील बागवान वस्तीतील ६६ वर्षीय पुरुष, आमराईतील ६४ वर्षीय पुरुष आणि भिकोबानगर येथील काल मृत पावलेल्या रुग्णाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
शहरात आज दिवसभरात सात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नव्वदीजवळ पोहचत असल्याचे दिसत आहे. एकीकडे शहरातील लॉकडाऊन शिथिल होत असतानाच कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच स्वतःहून दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.