आज बारामती मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
एकूण मृतांची संख्या १५ वर.
बारामती:वार्तापत्र आज सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बारामती शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णाची आकडेवारी खलील प्रमाणे आहे.
रविवारी २ ऑगस्ट रोजी बारामती मध्ये एकूण 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 83 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून तेरा नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे प्राप्त झालेल्या अहवालापैकी एकूण सहा नमुने बारामती शहरातील चार व कांबळेश्वर येथील एक युवक व पारवडी येथील एक पुरुष असे ग्रामीण भागातील दोन असे एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे व 77 जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 154 झालेली आहे बारामती शहरातील पॉझिटिव आलेल्यांमध्ये रुई येथील दोन जणांचा व तांबे नगर येथील एक जण व जाधव वस्ती फलटण रोड बारामती येथील एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच रात्री माळेगाव येथील पूर्वी पॉझिटिव असलेल्या रुग्णाला पुणे येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झालेला आहे , बारामतीतील मृतांची संख्या पंधरा झाली आहे तसेच उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 73 आहे