आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार
एसटीच्या तिकीटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
आज मध्यरात्रीपासून तब्बल 17 टक्क्यांनी एसटीचा प्रवास महागणार
एसटीच्या तिकीटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मुंबई :प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज (25 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ वाढ झाली. इंधन महागल्यामुळे आर्थिक गणितं जुळवताना एसटी महामंडळाची दमछाक होत होती. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दीपावली हा सण साजरा करण्यासाठी चाकरमाने शहरातून आपापल्या गावी जातात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असतानाही एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे