‘आज मेरा घर टुटा है कल तेरा घमंड टुटेगा’; मुंबईत पोहचल्यानंतरही कंगनाचा घणाघात सुरूच.
कंगना रनौत ने या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुला काय वाटतं की, तू माझं घर तोडून माझा बदला घेतला आहे.

‘आज मेरा घर टुटा है कल तेरा घमंड टुटेगा’; मुंबईत पोहचल्यानंतरही कंगनाचा घणाघात सुरूच.
मुंबई -बारामती वार्तापत्र
अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर कंगना आता जास्त आक्रमक होणार असल्याचे दिसून येत आहे. तीने मुंबईतील आपल्या घरी पोहचल्यानंतर थेट मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
कंगना रनौतने मुंबईतील घरी पोहचल्यानंतर, एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी भाषेत उल्लेख करीत, आज मेरा घर टुटा हे कल तेरा घमंड टुटेगा!
तुमने जो किया अच्छा किया #DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगना रनौत ने या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुला काय वाटतं की, तू माझं घर तोडून माझा बदला घेतला आहे.
आज मेरा घर तूटा है कल तेरा घमंड तूटेगा. हे काळाचे चाक नेहमी एकसारखे नसते. उद्धव ठाकरे ही जी क्रुरता आहे, आणि ही जी दहशत आहे. याला उत्तर दिले जाईल,
कंगनाने केलेल्या या मोठ्या वक्तव्यानंतर पुन्हा मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
याआधी कंगनाने ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिराची उपमा दिली. त्या ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, मणिकर्णिका फिल्म्स’मध्ये ‘अयोध्या’ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.
आणखी एका ट्विटमध्ये कंगनानं पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा फोटो शेअर केला. या फोटोवर तिनं बाबर आणि त्याचे सैन्य असं कॅप्शन दिलं आहे. यात तिनं #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे.
तिसऱ्या ट्विटमध्येही तिनं पाकिस्तान असं लिहिलं लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केली. याआधी कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर आता महापालिकेच्या कारवाईनंतर तिनं थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे.