आता ‘या’ वयोगटातील मुलांसाठीही मास्क बंधनकारक! WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स.
12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे.
आता ‘या’ वयोगटातील मुलांसाठीही मास्क बंधनकारक! WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स.
12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे.
जिनिव्हा, 23 ऑगस्ट : जगभरातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच पहिल्या दिवसापासून मास्कची सक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, अनेकदा एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे मोठ्यांसाठी मास्क बंधनकारक आहे मग मुलांचे काय? दरम्यान याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने मुलांच्या मास्कबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
WHO च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत.
WHOने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो.
जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे. WHOने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचेही सांगितले होते. WHOच्या मते, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर, 5 वर्षाखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही.
6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांसाठी नवे आदेश WHOने असे स्पष्ट केले आहे की, पाच वर्षांखालील मुलांना कोरोनाचा धोका नाही आहे.
त्यामुळे या वयोगटातील मुलांना मास्क घालणे बंधनकारक नाही. तर, 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांनी मास्कचा वापर करावा, कारण त्यांच्यामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे.
जगभरात 8 लाख लोकांचा मृत्यू
एएफपीच्या आकड्यांनुसार जगभरात कोविड-19 (Covid-19) च्या रुग्णांचा आतापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे संसर्ग झालेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार गेली आहे. वर्ल्ड ओ मीटरच्या आकड्यांनुसार संपूर्ण जगभरात 23,149,731 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे 8 लाख 03 हजार 807 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 57 लाख, 32 हजार 515 रुग्ण कोरोनापासून ठीक झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रकरणात अमेरिका जगभरात पहिल्या, ब्राजील दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूची सर्वाधिक संख्या अनुक्रमे अमेरिका, ब्राजील, मेक्सिको या देशात आहे. भारतात या यादीच चौथा क्रमांक आहे.