आता साडेपाच हजारांत ‘प्लाझ्मा’

राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोनाबाधितांवर प्रायोगिक तत्त्वावर नि:शुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे.

आता साडेपाच हजारांत ‘प्लाझ्मा’

राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोनाबाधितांवर प्रायोगिक तत्त्वावर नि:शुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे.

बारामती वार्तापत्र

करोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरेपी’द्वारे उपचार करण्यासाठी ‘प्लाझ्मा अफेरॅसिस’ पद्धतीने संकलित केलेल्या ‘प्लाझ्मा बॅग’साठी (२०० मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढय़ा, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रकमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील, अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोनाबाधितांवर प्रायोगिक तत्त्वावर नि:शुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे.

केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरेपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पद्धतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी खासगी व विश्वस्त रक्तपेढय़ांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी प्लाझ्माच्या प्रति डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत
तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारा खर्च व राष्ट्रीय रक्तधोरणानुसार निश्चित केलेल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या वा विशेष चाचण्या यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दरनिश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅग (२०० मिली) ५५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

चाचणीसाठी दर..
नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करून दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किमतीव्यतिरिक्त) तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किमतीव्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!