आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना दत्तात्रय मामा भरणे यांची भेट
मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी केली मदत

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना दत्तात्रय मामा भरणे यांची भेट
मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी केली मदत
निलेश भोंग; प्रतिनिधी
साठेनगर निमगाव केतकी येथील सोमनाथ सुभाष मिसाळ या युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी त्यांना गावातील काही लोकांनी सांगितले की सोमनाथ यांच्या मुलीच्या पोटात गाठ असून तिचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळला असून यात हा ऑपरेशनचा खर्च कुटुंबासाठी परवडणारा नाही.
याची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री भरणे यांनी सोलापूर येथील हॉस्पिटल ला फोन करून या मुलीस ॲडमिट करून ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या आणि वर खर्चासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोंग, अमोल राऊत, नानासाहेब मिसाळ, अमोल मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ तसेच या गावचे ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप उपस्थित होते.