आधुनिक जिजाऊ, सावित्री घडवाव्या लागतील – निताताई होले
सामाजिक कार्यकर्त्या छायाताई पडसळकर यांना "सावित्री-जिजाऊ" पुरस्कार जाहीर

आधुनिक जिजाऊ, सावित्री घडवाव्या लागतील – निताताई होले
सामाजिक कार्यकर्त्या छायाताई पडसळकर यांना “सावित्री-जिजाऊ” पुरस्कार जाहीर
इंदापूर प्रतिनिधी –
छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे असे दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना महाराष्ट्रात “आदर्श माता’ म्हणून पाहिले जाते. जिजाऊ मातांचा आदर्श घेऊन आजच्या काळात अनेक महिला आपल्या अपत्यांना संस्कारांची शिदोरी देत आहेत. या संस्कारांमुळेच त्यांच्या मुलांनी शून्यातून आपले विश्व उभे केले आहे. आधुनिक जगतात जिजाऊ आणि सावित्री घडवाव्या लागतील,” असे मत महात्मा फुले यांच्या पनतू सून नीताताई होले महात्मा फुले वंशज यांनी व्यक्त केले.
“जिजाऊ – सावित्री” जयंती उत्सवाचे आयोजन खंडाळा येथे केले होते, तेव्हा त्या बोलत होत्या. ग्रामस्वराज्य युवा सामाजिक संस्था,सुजन फाउंडेशन व महात्मा फुले विचार अभियान यांच्या विद्यमानाने आयोजित महोत्सवाला प्रमुख पाहुणे दौलतराव धेंडे (सचिव,महात्मा फुले सामाजिक संस्था), सौ.हेमलता ठोंबरे,नगरसेविका खंडाळा,सरपंच रुपाली जाधव,सुचेता हाडंबर,रुपाली गिरे,कृष्णात घाडगे,रुपाली बोरावके,उज्वला तांबे,अनुपमा दाभाडे, वैजता रिटे,कुबेर खांडेकर,आदी उपस्थित होते. या प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या छायाताई पडसळकर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना पडसळकर म्हणाल्या, “”सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणासाठी अंगावर चिखल झेलला; परंतु आजही सावित्रीबाईंचा संघर्ष संपलेला नाही. समाजात काम करताना ग्राम स्वराज्य युवा सामाजिक संस्था, सुजन फाउंडेशन व महात्मा फुले विचार अभियान यांनी महिलांच्या पाठीशी उभे राहावे.”
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शीतल महांगरे,समिना शेख, प्रिया ननवरे,मोहन बोरकर,निखिल राऊत,प्रशांत शिंदे, उद्धव करणे,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित जाधव तर सूत्रसंचालन गार्डे यांनी केले. संदीप ननवरे यांनी आभार मानले.