आनंदाची बातमी. दोन जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज,पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला
राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

आनंदाची बातमी. दोन जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज,पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला
राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
पुणे: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
सध्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण उद्यापासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस
पुणे शहरात शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाकडून शनिवारी सकाळीच तसा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला.
मान्सून दोन दिवसात केरळमध्ये
भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल
महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?
सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?
स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.