आपत्यहीन जोडप्यांना मातृत्वाचा दिलासा म्हणजे ‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” : डॉ आशिष जळक.
आतापर्यंत १५०० जोडप्यांना आपत्यप्राप्ती.
आपत्यहीन जोडप्यांना मातृत्वाचा दिलासा म्हणजे ‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” : डॉ आशिष जळक.
आतापर्यंत १५०० जोडप्यांना आपत्यप्राप्ती.
बारामती वार्तापत्र – आपत्यहीन व वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आपत्यप्राप्ती चा आनंद देत सामाजिक बांधिलकी जोपासत
चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ची वाटचाल चालू आहे अशी माहिती प्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ञ व सेन्टर चे संचालक डॉ आशिष जळक यांनी दिली.
बारामती शहरातील इंदापूर रोड येथे ‘चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ ची दिमाखदार इमारत उभी आहे.
अपत्यप्राप्ती आणि वंध्यत्व यांचं नातं नाळेसारखंच घट्ट बनतंय.. सध्या समाजापुढील महत्त्वाच्या असणाऱ्या समस्यांपैकी ही एक समस्या बनतेय.धावपळीच्या जीवनात अलीकडे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असतानाच टेस्ट ट्यूब बेबी हा अपत्यप्राप्तीचा पर्याय मागील दोन दशकांत पुढे आला.
आता तो सर्रास ही वापरला जातो. बारामतीच्या चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सेंटरने तर यापुढे जाऊन यात होणाऱ्या खर्चावर नियंत्रण म्हणून चैतन्य मातृत्व योजना आणली आहे. तिची मुदत 20 जून ते येत्या 15 जुलै पर्यंत आहे.
या पूर्वी सेन्टर च्या माध्यमातून बारामती इंदापूर दौंड,फलटण,अकलूज,आदी तालुक्यात प्रत्येक गावोगावी वनध्यत्व निवारण कॅम्प घेण्यात आले अल्प दरात ही सुविधा असल्याने प्रचंड प्रतिसाद मिळाला व अनेक जोडप्यांना याचा फायदा झाला आहे.
अजित दादा च्या वाढदिसा निमित्त.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सदर योजना सुरू केली आहे.
- चैतन्य टेस्ट बेबी सेंटरचे प्रमुख डॉ. आशिष जळक यांनी ग्रामीण भागातील टेस्ट ट्यूब बेबी द्वारे अपत्यप्राप्ती करू इच्छिणाऱ्या दाम्पत्यांसाठी ही मोफत टेस्ट ट्युब बेबी संकल्पना आणली आहे. येत्या 20 जून पासून याची सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिल्या 55 जोडप्यांसाठी सोडत घेतली जाणार आहे यामधील
भाग्यवान 5 दाम्पत्यांना टेस्ट ट्यूब बेबीचा संपूर्ण खर्च मोफत असणार आहे.
या 55 दाम्पत्यांच्या प्रत्येकी 11 या प्रमाणात पाच बॅचेस केल्या जाणार असून तर उर्वरित 50 दाम्पत्यांसाठी सवलतीच्या दरात
टेस्ट ट्यूब बेबी चे उपचार दिले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील गरजू दांपत्यांना टेस्ट ट्यूब बेबीचा खर्च हा
परवडण्यापलीकडे असतो, हे जाणून घेऊन डॉ.जळक त्यांनी एक वेगळी योजना कोरोना महामारी च्या संकटाच्या निमित्ताने आपल्या दवाखान्यासाठी लागू केली आहे.
यामध्ये 50 दांपत्यांकरिता 80 हजार रुपयांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी
वरील सर्व उपचार केले जाणार आहेत, तर मेडिकल मधील औषधांचा खर्च ना नफा ना तोटा या धर्तीवर 35 हजारांपर्यंत
येणार आहे.
यासंदर्भात डॉक्टर जळक म्हणाले, खरे तर अशा प्रकारची योजना घ्यावी हा रुग्णांचा व रुग्णांच्या नातेवाईकांचा
आग्रह होता. ग्रामीण भागात टेस्ट ट्यूब बेबीचा खर्च कमी करणे व त्यातही सध्या कोरोनाच्या महामारीमुळे संकटात आलेल्या अर्थकारणावर एक पर्याय म्हणून अशा स्वरूपाच उपचार पद्धती
उपचारपद्धती करण्याचे मनात होते, त्यानुसार हे अभियान 20 जून ते 15 जुलै या कालावधीत आम्ही राबवणार आहोत.
या निमित्ताने अपत्यप्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दाम्पत्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण आणावेत आणि हे सुखाचे
क्षण आणताना त्याच्या चेहऱ्यावरील समाधान कायम रहावे यासाठी आम्ही हा सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम
स्वीकारला आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याकरता संपर्क क्रमांक -9527071814,9552729700
याचा व्हिडीओ येथे पहा…
https://youtu.be/XNnFl0gkSUo