स्थानिक

‘आमचं ठरलंय’ दोन वर्षाच्या खंडानंतर,संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्कामासाठी बारामतीतील शारदा प्रांगण येथे भव्य शामियाना!

वारकर्‍यांच्या अंघोळीसाठी उपाययोजना सुरू

‘आमचं ठरलंय’ दोन वर्षाच्या खंडानंतर,संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्कामासाठी बारामतीतील शारदा प्रांगण येथे भव्य शामियाना!

वारकर्‍यांच्या अंघोळीसाठी उपाययोजना सुरू

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील पालखी मुक्कामासाठी शारदा प्रांगणात उभारणार भव्य शामियाना; अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केली. विविध शासकीय खात्यांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे अभियंता धनंजय गावडे, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे आदी या वेळी उपस्थित होते. पालखी महामार्गाच्या अधिकार्‍यांनाही या वेळी बोलाविण्यात आले होते.

रोटी घाटापासून सोहळा पुढे येत असताना काही ठिकाणी सेवारस्त्याची गरज आहे, त्यासंबंधी चर्चा झाली. बारामतीत शारदा प्रांगणात पालखी सोहळा 28 जून रोजी मुक्कामी असेल. त्यानुषंगाने सोहळ्यासाठी आवश्यक तयारीची देशमुख यांनी माहिती घेतली. शारदा प्रांगणात नगरपरिषदेकडून पालखी सोहळा मुक्कामासाठी भव्य शामियाना उभा केला जाणार आहे.

या ठिकाणी त्यासाठी आवश्यक ते काम सध्या सुरू करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार विजय पाटील म्हणाले की, पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे शारदा प्रांगणातच मुक्कामी असेल.

२८ जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे. या ठिकाणी नगरपरिषदेकडून भव्य शामियाना उभा केला जाणार आहे. दरवर्षी पालखी पाटस रस्त्यावरून देशमुख चौकातून शारदा प्रांगणात येते, परंतू यावर्षी दोन वर्षाच्या खंडानंतर सोहळा सुरू होतो आहे. त्यामुळे सोहळा विश्वस्तांना देशमुख चौक, सातव चौक, आगरवाल विद्यालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय या रस्तादेखील दाखवण्यात आला होता. या मार्गाच्या वापरातून संभाव्य गर्दी टाळता येईल. मात्र मात्र यंदा जुनाच मार्ग वापरण्याचे ठरले आहे.

वारकर्‍यांच्या अंघोळीसाठी उपाययोजना सुरू

शहरातून वाहत असलेल्या निरा डावा कालव्यात सिमेंट अस्तरीकरण करण्यात आले आहे. कालव्यामध्ये अनेक वारकरी अंघोळ, कपडे धुण्यासाठी उतरत असतात. अस्तरीकरणामुळे बारामतीत ती सोय उरलेली नाही. त्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत देशमुख यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!