स्थानिक

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत येऊन पवारांवर तोफ डागली… पडळकरांचं पवारांवर टीकास्त्र

गोपीचंद पडळकरांनी आज बारामती दौऱ्यावर बारामतीच्या विविध भागात वंजारी,तेली, शिंपी, माळी, रामोशी सामाज्याच्या घोंगड्या बैठका सुरु केल्या आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत येऊन पवारांवर तोफ डागली… पडळकरांचं पवारांवर टीकास्त्र

गोपीचंद पडळकरांनी आज बारामती दौऱ्यावर बारामतीच्या विविध भागात वंजारी,तेली, शिंपी, माळी, रामोशी सामाज्याच्या घोंगड्या बैठका सुरु केल्या आहेत.

बारामती वार्तापत्र 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारामतीत येऊन पवारांवर तोफ डागली. “फुले, शाहू, आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संवैधानिक हक्कांवर गदा आणण्याचे आणि त्यांचा गळा घोटण्याचे महापाप पवारांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे.

महाराष्ट्रात अत्यंत गंभीर स्वरुपाच्या तीन घडामोडी घडल्या आहेत. गरीब मराठ्यांना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींंचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके-विमुक्त, भटक्या जमाती व इतर मागास यांचे पदोन्नतीतील आरक्षण स्थगित केले. बहुजन समाजातील या सर्व घटकांना हे सरकार जर दाबत असेल, तर आता सर्वांनी जागे होण्याची गरज आहे, असे सांगत पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा, असे आवाहन पडळकर यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती आरक्षणाबाबत जेव्हा बैठक झाली, तेव्हा काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले. त्यानंतर अवघ्या दोन तासातच अजित पवार यांच्या ट्विटरवरून सांगण्यात आले की, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, किंवा तशी चर्चाही झाली नाही. त्यानंतर पुन्हा नितीन राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, आम्ही मागणी मांडली आहे, त्याच्यावर निर्णय झाला नाही. म्हणजे हे माध्यमांसमोर बोलतात वेगळे आणि कॅबिनेटमध्ये वेगळाच निर्णय होतो. असेही पडळकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ – पडळकर

महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. गृहमंत्र्यांचा विषय आला की, कामगार मंत्री बोलतो. शिक्षण खात्याचा विषय आला की, दुसराच मंत्री बोलतो. आरोग्य मंत्र्याचा विषय आला की, अर्थमंत्री बोलतो. अर्थमंत्र्यांचा विषय आला की, खासदार बोलतो. अशा प्रकारे या सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू असून, त्यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

‘अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीने निवडणूक लढवली’

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार ठीक ठिकाणी सांगत असतात. हाच धागा पकडून पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली. पुढे म्हणाले की, आटपाडी तालुक्यातून सांगली, सातारा जिल्हा सोडून अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीने निवडणूक लढवली. अजित पवारांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन स्थानिक नेत्यांचे पाठबळ नसताना निवडणूक लढवली तर तुमची ही अवस्था तीच होईल.

‘गायकवाड आयोगाचा अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतरित का नाही केला?’

राज्यात विविध प्रश्न आहेत. मराठा आरक्षण का गेले. गायकवाड आयोगाचा अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतरित का नाही केला. तुमचेच वकील सांगतात की, राज्य सरकार कागदपत्र देत नाहीत. वेळोवेळी माहिती देत नाहीत. ओबीसीचे आरक्षण का संपले. पदोन्नतीतील आरक्षणाचा जी. आर कधी रद्द करणार. बीडमधील आरोग्य कर्मचारी आपल्या समस्या घेऊन पवार यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या विषयावर तुम्ही बोला. प्रश्न सोडून तुम्ही दुसरीकडे कशाला जाताय, असेही पडळकर म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!